Ad will apear here
Next
सातारा जिल्ह्यात महिलेवर यशस्वी ब्रॅकीथेरपी
सातारा : येथील ऑन्को लाइफ सेंटरमध्ये डॉ. करण चंचलानी यांनी अत्याधुनिक ब्रॅकीथेरपीचा वापर करून अवघ्या एका आठवड्यात स्तनांचा कर्करोग असलेल्या ६६ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार केले.

या ठिकाणी दाखल होण्याआधी त्यांच्या डाव्या स्तनावर ब्रेस्ट संवर्धनशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रेडिएशनसाठी ऑन्को लाइफ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या छातीत १.५ बाय १.२ बाय १ सेंटीमीटर आकाराचा छोटा ट्युमर आढळून आला. त्यांचे कक्षा गाठबिंदू निगेटिव्ह होते आणि त्यांची पॅथेलॉजिकल स्टेज पीटी१एन०(स्टेज १)ही होती. त्यांना हृदयविकार व मानसिक आजारांसारखे इतर आजारही होते. त्यामुळे स्तनांची स्थिती पाहण्यासाठी आणि योग्य निदान करण्यासाठी रेडियोथेरपीची  आवश्यकता होती.   

विस्तृत तपासणी केल्यानंतर ब्रॅकीथेरपीचा उपयोग करून अॅक्सिलरेटेड पार्शिअल ब्रेस्ट इर्रेडिएशन (एपीबीआय) करण्याचे नियोजन करण्यात आले. पारंपरिक रेडिएशन थेरपीला सहा आठवडे लागतात; मात्र या अत्याधुनिक पद्धतीला केवळ एक आठवड्याचा कालावधी लागला. ही प्रक्रिया  यशस्वी ठरली आणि उपचार पूर्ण झाल्याच्या दिवशी या महिलेला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

या विषयी बोलताना ‘ऑन्को लाइफ’चे डॉ. चंचलानी म्हणाले, ‘ब्रॅकीथेरपीमध्ये रेडियोअॅक्टिव्ह मटेरिअल थेट ट्युमरच्या आत किंवा बाजूला ठेवण्यात येते. ब्रॅकीथेरपीला इंटर्नल रेडिएशन थेरपी असेही म्हणतात. त्यामुळे फिजिशिअन एक्स्टर्नल बीम रेडिएशनच्या तुलनेत थोड्या काळात थोड्या भागावर उपचार करण्यासाठी रेडिएशनचा मोठ्या प्रमाणावरील डोस वापरू शकतो.’

‘ब्रॅकिथेरपीचे अनेक फायदे आहेत. रेडिएशन अत्यंत उच्च पातळीच्या अचूकतेने देण्यात येत असल्याने कर्करोगावर उपचार करण्यासाठी ही पद्धत खूपच परिणामकारक आहे. शरीरातून अत्यंत टारगेटेड आणि निश्चित प्रकारे रेडिओथेरपी देण्यात येत असल्याने याचे दुष्परिणाम कमी असतात. रुग्णाला इतरही आजार असल्यामुळे अधिक काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेणेही शक्य नव्हते. या थेरपीमुळे रुग्णाला लाभ झाला. या उपचारांसाठी एक ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. त्याचप्रमाणे या उपचारांनंतर दोन ते पाच दिवसांत बरे वाटू लागते,’ अशी माहिती डॉ. चंचलानी यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZKABU
Similar Posts
ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्कार सातारा : आरोग्य क्षेत्रात अतिशय कमी कालावधीत अद्ययावत उपचारपद्धतींसह ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त करून रुग्णांना अधिकाधिक उत्तम आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरला बंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल म्हणून ‘इंडियन अचिव्हर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
‘आँको लाइफ’तर्फे मौखिक कर्करोग दिन साजरा सातारा : शेंद्रे येथील आँको लाइफ कॅन्सर सेंटरतर्फे मौखिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून २७ जुलै रोजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मौखिक कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी रुग्णालयातील कर्करोग शल्यचिकित्सक विभाग, दंत विभाग आणि कर्करोग प्रतिबंध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन केले होते
‘ऑन्को लाइफ’ला ‘एनएबीएच’ची मान्यता सातारा : शेंद्रे येथील ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर या सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलला ‘हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ’ (एनएबीएच) या संस्थेची मान्यता मिळाली असून, हे जिल्ह्यातील पहिले ‘एनएबीएच’ मान्यताप्राप्त सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय ठरले आहे.
‘एसबीआय लाइफ’तर्फे जागृती अभियान मुंबई : एसबीआय लाइफ इन्शुरन्स या भारतातील सर्वांत मोठ्या खासगी विमा कंपनीने ‘थँक्स ए डॉट’ या ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागृती करणाऱ्या नाविन्यपूर्ण अभियानाची घोषणा केली असून, या अभियानास टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचा वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्ह या उपक्रमाने पाठिंबा दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language